दगडात देव आहे का ? किंवा दगडात देव असू शकतो का ?

दगडात देव आहे का ?
किंवा दगडात देव असू शकतो का ?

माझा दृष्टीकोन..

दगडात कसा काय देव असू शकतो ?
हा प्रश्न हल्ली अनेकजण विचारताना दिसतात..
हाच प्रश्न मी आज स्वतःला विचारला,
आणि मला जे उत्तर सापडलं ते मी तुमच्याशी ‘शेअर ‘ करू इच्छितो..

मुळात,’ दगड ‘ ह्यात काय ‘गुण ‘आहेत ज्यामुळे दगडात देव आहे ह्याचा विचार करू..
सर्वप्रथम म्हणजे,
दगड हा सगुण असला, तरी निर्विकार आहे..
दगडाला कुठचीही ‘भावना ‘ नाही..
स्वभाव अतिशय कणखर..
दगडाला त्याच्या स्वभावाचा ‘ गर्व ‘नाही..’
‘अहंकार ‘तर त्याहून नाही…
दगडाला कुठचाही ‘ लोभ ‘नाही.
.’ काम,क्रोध,मत्सर’ ही नाही.
.’Superior किंवा Inferior हा Complex नाही..

आपल्यापेक्षा एखादा दगड मोठा आहे, ह्याचं दुःख नाही, कि ‘ आपण कुणाच्यातरी पेक्षा मोठे आहोत ‘ ह्याचा आनंद नाही..
कसलाही अभिमान नाही..
आपल्यावर पाय ठेवून कुणीतरी वर चढतोय ही इर्षा नाही, आसुया नाही…
मंदिरातल्या दगडाची, रस्त्यावरच्या दगडाला ‘ हेटाळणी’ नाही..
‘ उच्च,’ ‘ नीच ‘ हा भेद नाही..

लहान दगड, वृद्ध दगडाला वृद्धाश्रमात टाकून जात नाही,

किंवा मोठा दगड, चिमुकल्या दगडाला पायरीवर सोडूनही जात नाही…

दगड कधीच दुधाचा ‘अभिषेक ‘मागत नाही.
.’शेंदुराचा लेप ‘ मागत नाही..
कधीच ‘चद्दर ‘ किंवा
Candle सुद्धा मागत नाही..
दगडाला सोन्याचे मुकुट नकोत,
कि चांदीचे चौरंग नकोत..

अरे कोण म्हणतं कि दगडात देव नाही ?
मी म्हणतो,
“कि दगडात हे सगळे दुर्गुण नाहीत..
म्हणूनच दगडात देव ‘ आहे ‘ ..नव्हे..
आता फक्त दगडातच देव आहे..
फक्त दगडातच देव आहे..

व पु काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *